
चंद्रपूर (Chandrapur) :-
प्रिय जया काकू!
सा. न. वि.वि.
तुम्ही चांगल्या अभिनेत्री आहात, खासदार आहात, अमिताभ बच्चन ची बायको आहात इथपर्यंत ठीक आहे. आम्हाला आदर आहे तुमचा. पण हे असं वागणं…? म्हणून सादर पत्र!
जयाजी ! तुम्ही आज पुन्हा भडकल्या !कोणीतरी फॅन जवळ आला सेल्फी काढायले. झालं! तुमचा पारा गेला हाय वर. तुम्ही म्हाताऱ्या झाल्यापासून जरा जास्तच चिडचिड करता बुवा! तुमचं काही खरं नाही. जेव्हा पहावं तेव्हा फॅनवर खेकसतच राहता. म्हातारपणात जास्तच घनान्या झाल्या आहा. काय कारण असावं?
घरातही अशाच वागत आसन का.!आता ‘जलसा’ च्या आतमध्ये जाऊन आपण काही पाहू शकत नाही पण अमितजी सकाळी उठून शूटिंगले पळते. कधी कधी ते कामावर जातो म्हणून तुम्हाले सांगते आन् दुसरा बंगला प्रतीक्षावर जाऊन ‘सिलसिला’चे गाने आयकत खिडकीतून बाहेर पाह्यत रायते. बऱ्यांचदा त्यांच्या चेहऱ्यावर, ‘येवढे ऑप्शन असूनही चूक कशी झाली?’असे भाव दिसते, त्याईच्या डोळ्यात. म्हनून म्हणतो सांभाळा!
कदाचित तुमच्या या अशा स्वभावामुळेच ते जास्त काम करण्याच्या बहान्यानं घरच्या बाहेर राह्यते. त्यांच्याशी जरा प्रेमानं वागत जा जरा काकू! त्याईच्या डोक्यातून रेखा नवाच भूत अजून काही गेलं नाही, हा तुमचा गैरसमज नाही. पन आता जाऊ द्या ना! तुम्ही अशा वागान् तं मानूस तरी काय करन म्हना!आता शूटिंग संपल्यावर ते सरळ घरीच येते, भाजला पापड मोडणं जमत नाही आता, आन् तुम्ही अजून तेच धरून ठेवता!
तसही घरात एकलाच कमवता मानूस आहे. अभिषेकचं अजूनही कामांचं बरोबर जमलं नाही. प्रयत्न करतच आहे बिचारा! सुनेवरचा राग काढता का बापा आता बाहेरच्या लोकांवर? आता हिरोईन सून केल्यावर तिला काय घरात झाडू पोछा कराले सांगान? एकाला कोनाची सून सासुचं आईकते, तं तुमची आयकन्? आता या वयात आपणही कानाडोळा कराचा ना जया काकू!सयपाकाले, झाडुपोछाले बाया असनच ना! तरी येवढी चिडचिड करता?
आराध्या तुमची नात! आता मोठी झाली. तिची चांगली मैत्रीण व्हा. तिच्या कॉलेजच्या गमती जमाती आयका आनं एंजॉय करा! हे काय लावलं, याच्यावर खेकस त्याच्यावर खेकस! बरं दिसत नाही ना जया काकू थ्ये! मन दुखते माह्यवालं म्हनून आपलं सांगून पाहिलं ब्वा! तसं तुमी आयकान याची गॅरंटी कमीच आहे म्हना!
आमच्याकडे अशा बायांना नसानकोंबडी म्हनत्यात!
बरं घेतो आटोपतं! कळावे लोभ असावा ही विनंती! तुम्ही जास्त वाईट वाटून घेऊ नका! पन जमत असीन तं असं वागत जाऊ नका! या वयात शोभत नाही ना काकू तुमाले ते!
आपला
प्रशांत बोराडे.
(जया बच्चन यांच्या सर्व फॅन्स ना माफी मागून सादर)\
What has Jaya Bachchan done?