मित्राच्या मनातील भाव समजून घेणे हाच मित्र धर्म :आचार्य रौनकजी महाराज

0

गेडाम ले- आउट येथे श्रीमद् भागवत कथेचा सातवा दिवस

ता प्र हिंगणा (ता.२६): मित्रानी न सांगता मित्राच्या मनातील भाव व अवस्था समजून त्याला मदत करतारा खरा मित्र असुन भौतिक संपत्तीला महत्व न देता ज्यात मित्रता,भक्ती व विनम्रतेचा भाव सुदामा चरित्रात आहे असे मत भागवत कथेच्या सातव्या दिवसी वृंदावन निवासी पुज्य आचार्य रौनकजी महाराज यांनी श्रीमद् भागवत कथा सांगतांनी व्यक्त गेडाम ले- आउट येथे व्यक्त केले.

माॅनिग यंग ग्रृप एमआयडिसी हिंगणा व पांडे परिवार द्वारा आयोजित श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाच्या आज सातव्या दिवसी द्वारीका लिला, सुदामा चरित्र, श्री शुकदेव पूजा कथेचे पठन करण्यात आले असुन श्रीमद् भागवत कथा श्रवणामुळे मानव चरित्रवान व सद्गुणी बनतो म्हणून भागवत कथा कार्यक्रमाचे आयोजन व श्रवण गरजेचे असल्याचे मत आचार्य रौनक जी महाराज यांनी कथेतून सांगीतले. ग्रंथ व व्यास पुजनाचा मान सामाजिक कार्यकर्ता रमेश सिंह व परिवार, उघोगपती सुभाष यादव व परिवार, एल आय सी अधिकारी डि आर सिंह, काॅन्टाक्टर कमलेश सिंह बघेल, माजी एएसआई कैलाश सिंह, उधोजक अलोक तिवारी, उधोजक गुप्ता आणि ट्रान्सपोर्टर मलखाम उर्फ राकेश सिंह व परिवार, यांना प्राप्त झाला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता माॅनिग यंग ग्रृप एमआयडिसी हिंगणाचे अध्यक्ष माजी पो.उपनिरिक्षक विनोद सिंह, उपाध्यक्ष माजी पोलिस निरिक्षक अरविंद रघुवंशी,ग्रृपचे सल्लागार मलखाम उर्फ राकेश सिंह,ग्रृपचे संयोजक वरिष्ठ पत्रकार लिलाधर दाभे, ग्रृपचे सल्लागार रामउदार सिंह, माजी पो निरिक्षक तेजराव भुसारी, माजी पो निरिक्षक तेजबहादूर उपाध्याय, माजी पो निरिक्षक जे. आर. सिंह, उधोजक हरिश्चंद्र बेलखेडे, बि पी सिंह, संतोष गुप्ता, धिरेंद्र पांडेय, अजित पांडेय, जयप्रकाश मिश्रा,भरत सिंह, सुभाष यादव, छोटूभैया अग्निहोत्री,अरूण पांडे, विशाल पांडे , नेहा पांडे, प्रिया पांडे, अन्नपूर्णा पांडे, छाया पांडे, मनोज उघड़े, प्रिती पांडे, मनोज उघड़े, आदीनी अथक परिश्रम घेतले