
मुंबई (Mumbai) दि. १ :- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, चेंबूर येथील चिरागनगर येथे उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्यास राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम (Dharmapal Meshram) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मुंबई उपनगर चे सहायक आयुक्त रविकिरण पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री.मेश्राम म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य केवळ राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. रशियामधील विद्यापीठांमध्ये त्यांच्या साहित्याचे अध्ययन केले जाते तसेच मॉस्को येथे त्यांचा पुतळामहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Chief Minister Devendraji Fadnavis) यांचे पुढाकारातून उभारण्यात आलेला आहे, ही संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
ह्यावेळी माजी नगरसेवक शरद कांबळे, भालचंद्र शिरसाट, राहूल कांबळे, शंकरराव कांबळे, योजना ठोकळे, प्रकाश कांबळे, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे वरिष्ठ लिपीक शेख अय्युब, समाज कल्याण निरीक्षक संदीप चव्हाण, वैभव कांबळे व बरेच पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.