
(mumbai)मुंबई : आमदार अपात्रतेच्या मुद्यावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला असून या दोन्ही याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी एकत्रित सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Hearing in Supreme Court) त्यामुळे आता राज्याचे लक्ष १३ ऑक्टोबरच्या सुनावणीकडे लागलेले आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने (Sharad Pawar Faction) अजित पवार (Ajit Pawar Faction) गटाविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर (Maharashtra Political Crisis) सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. (Legislative Assembly Speaker Rahul Narvekar)विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दिरंगाई करीत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. शरद पवार गटाकडूनही अशाच प्रकारचा आरोप सुरु आहे. त्यामुळे ही दोन्ही प्रकरणे एकसारखी असल्याने दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी १३ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.