
महापालिकेच्या इतिहासातील ऐतिहासिक दसरा महोत्सव।
पोलिस आयुक्तांच्या हस्ते वाईटाचा दाह आणि ‘नशा मुक्ती’चा बुलंद संदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून ‘धम्मचक्र, गांधी आणि विजयोत्सवाचा त्रिवेणी संगम’
नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर शहर आणि ग्रामीण जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला भव्य दसरा महोत्सव हा नागपूरकरांच्या मनात एक अविस्मरणीय अनुभव ठरला. उत्सवी वातावरण, प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती आणि सामाजिक संदेशाची स्पष्टता यामुळे या सोहळ्याला अभूतपूर्व यश मिळाले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या रावण दहनाच्या समारंभासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त मा. श्री. रवींद्र सिंघल यांना प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते परंपरागत पद्धतीने रावण दहन करण्यात आले.
रावणाच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर आपल्या भाषणात पोलीस आयुक्तांनी, रावणाप्रमाणेच समाजातील वाईट सवींचे दहन करण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुण पिढीला उद्देशून ‘नशा मुक्ती’चा अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश दिला आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे नम्र आवाहन केले. हा सोहळा शहर अध्यक्ष श्री. अनिल अहिरकर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. राजाभाऊ टाकसाळे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली पार पडला मा. आमदार श्री. कृष्णा खोपडे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती, ज्यांनी या सोहळ्याच्या सामाजिक विचारांचे कौतुक केले माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आगामी कार्यांसाठी मार्गदर्शन केले. भीम गीतांच्या विशेष कार्यक्रमांनी उपस्थितांना विचार आणि संगीताची अनोखी जोड दिली. तसेच विविध सांस्कृतिक नृत्ये सादर करण्यात आली, ज्यामुळे दसरा उत्सवाच्या उत्साहात भर पडली. या ऐतिहासिक कार्यक्रमाचे संयोजक कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्यासह सह-आयोजक तानाजी वनवे, सौ. मालूताई वनते आणि विजय वनवे यांनी कार्यक्रमाच्या भव्यतेसाठी रात्रंदिवस परिश्श्रम घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला अध्यक्ष सुनीता येरणे, युवक अध्यक्ष विशाल खांडेकर, बजरंग सिंह परिहार, जानबाजी मस्के, चंद्रकांत नायक, लक्ष्मी सावरकर, नूतन रेवतकर, राकेश घोसेकर, विवेक वानखेडे, मेहबूब पठाण, एकनाथ फलके, राजू मिश्रा, किरण नंदनवार, पुंडलिक राऊत, ब्रह्मानंद मस्के, राहुल कांबळे, राजेंद्र भोयर, संतोष भुजाडे, निखिल चाफेकर, यशश्री बनसोड, अंजुम शेख, शोभा कोटेकर, भारती गायद्यने, ज्योती कावरे, निसार अली, अविनाश पार्डीकर, चंद्रकांत नाईक सर्व नेते, प्रदेश पदाधिकारी, तसेच शहर आणि ग्रामीणचे सर्व घटक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.