
-आमदार यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur)
(Amravti)अमरावती – 2 ऑक्टोंबरपासून निघालेली (BJP’s OBC visit)भाजपची ओबीसी यात्रा आज अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे दुपारी पोचणार असतानाच काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली. ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे, एकहाती सत्ता असणारे केंद्र सरकार ओबीसीची जनगणना का करत नाही? अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. ही यात्रा सामान्य लोकांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी आहे. का एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भांडण करायला लावायचं? सोयाबीन, संत्र्यांच्या भावाचे प्रश्न हे बाजूलाच राहिले. मात्र, हे ओबीसीची यात्रा काढणार, जनगणना नाही करणार, भाजप आणि संघ एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवतात अशी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.