

मेट्रो ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल ; प्रवासी संख्येत वाढ
नागपूर (Nagpur)२५ : काल दिनांक 24 जून (सोमवार) पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, महा मेट्रो नागपूरने ही मेट्रो ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करत प्रवासी संख्या दर 10 मिनिटांनी उपलब्ध करण्यात आल्या होत्या त्याचाच फायदा नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये झाल्याच्या निदर्शनास आले आहेत. काल नागपूर मेट्रो रेलची प्रवासी संख्या 93103 एवढी होती जे कि मागील आठवड्याच्या (17 जून,सोमवार ;प्रवासी संख्या 65416) तुलनेत 42% ने जास्ती होती. प्रवासी संख्या वाढावी या करता महा मेट्रो तर्फे सर्वंकष होणाऱ्या प्रयत्नांचेच हे फलित आहे
उल्लेखनीय आहे कि, नागपूर मेट्रोने प्रवासी तिकीट संरचना केली होती ज्यामध्ये मेट्रो ट्रेनच्या भाड्यात 33% पर्यंत कपात करण्यात आली होती तसेच, विद्यार्थ्यांना महाकार्डवर मिळणाऱ्या 30% डिस्काउंट शिवाय नव्या संरचनेनुसार शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थीकरता हे भाडे जवळपास 50% पर्यत कमी झाले आहे. त्यासोबतच मेट्रो ट्रेनमध्ये (कुठलेही अतिरिक्त भाडे न घेता) सायकल सोबत घेऊन जाण्याची परवानगी देते.
महा मेट्रोने नुकतेच व्हॉट्सऍप तिकीट सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचत नाही तर यामुळे तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाहीशी झाली आहे. महा मेट्रोने प्रवाश्याना तिकीट खरेदी करिता खालील अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.ज्यामध्ये ;तिकीट काउंटर,तिकीट व्हेंडिंग मशीन,तिकीट बुकिंग ऍप,महा कार्ड (10% डिस्काउंट),विद्यार्थी महा कार्ड (30 % डिस्काउंट) समावेश आहे.
दिनांक 24 जून (सोमवार) पासून नागपूर मेट्रोच्या खापरी,ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या चारही टर्मिनल स्टेशनवरून मेट्रो सेवा सकाळी 8 ते रात्री 8 वाजता दरम्यान दर 10 मिनिटांनी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ज्याचा फ़ायदा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी आणि व्यावसायिक वर्गाला देखील होत आहे.