
(Parbhani)परभणी – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत असून त्यांची प्रकृती ढासळली असल्याने त राज्यभरातील मराठा समाजात आक्रमक झाला आहे. परभणी जिल्ह्यातही मराठा समाजाने काल चक्काजामची हाक दिली होती आणि आज जिल्हाभरात सर्वत्र चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाभरात वाहतूक व्यवस्थेला खीळ बसली आहे. पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त केलेला आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सकल मराठा समाज या आंदोलनातून करीत आहे.