
असोसिएशन फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट (एड)चे आयोजन
नागपूर – विदर्भातील उद्योग क्षेत्रांमध्ये महत्वाचे योगदान असलेल्या बांबू क्षेत्राला भविष्यात विकासाच्या भरपूर संधी असून ऍडव्हांटेज विदर्भ – खासदार सांस्कृतिक महोत्सवामुळे त्याला प्रोत्साहन मिळेल, असे मत बांबू क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी NITIN GADAKARI यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘ऍडव्हांटेज विदर्भ – खासदार सांस्कृतिक महोत्सव’ जानेवारी 2024 मध्ये होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर शनिवारी जोग सेंटर, तात्या टोपे नगर येथे असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एड)च्यावतीने बांबू क्षेत्रातील प्रमुख सदस्यांची बैठक घेण्यात आली. या या बैठकीला एडचे अध्यक्ष आशीष काळे, सचिव डॉ. विजय शर्मा यांच्यासह बांबू क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे संयोजक आर्की. सुनील जोशी तर सहसंयोजक राहूल देशमुख होते. समीर देशमुख, प्रो. उदय गडकरी, आर्की. गणेश हरीमकर, आर्की. महेश मोखा, डॉ. लाल सिंग, वेज्ञानिक, पंजाबराव कृषि विद्यापीठ प्राध्यापक डॉ. विजय इलोरकर, प्रिंसिपल (आयडियाज) मिलिंद गुजरकर, आर्की. पराग घुबडे, बांबू टेक्नॉलॉजिस्ट कंसलटंन्ट प्रताप गोस्वामी, अर्थज्ञ प्रदीप माहेश्वरी, बांबू सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भप्रांत, चे अध्यक्ष अजय पाटील, भव्य सृष्टि उद्योग समूह ( छग) चे प्रतिनीधी मनन पटेल यांची बैठकीला विशेष उपस्थिती होती. यावेळी बांबू उद्योगात संशोधन, बांबू उद्योगाचे पायाभूत सुविधा बदलण्यासंदर्भात तसेच, बांबूमधून काय नवीन निर्माण होऊ शकते, बांबू उद्योगात नवीन तंत्रज्ञान विकसित कसे केले जाऊ शकते यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.