पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही शुभमन नाहीच

0

(Chennai)चेन्नई : एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (ICC World Cup-2023)भारताचा सलामीवीर शुभमन गिल आता पाकिस्तानविरुद्ध शनिवारी होणाऱ्या सामन्यातही खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. (Opener Shubman Gill) डेंग्यूने आजारी असलेल्या शुभमन गिलच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्याला चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला सुटी देण्यात आली आहे. मात्र, गिल बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. शनिवारी होणाऱ्या सामन्यातही तो खेळण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गिलच्या अनुपस्थितीत ईशान किशन रोहित शर्मासोबत सामन्याची सुरुवात करु शकतात. बीसीसीआयने मंगळवारी शुभमन गिलच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती दिली. शुभमन गिल टीमसोबत दिल्लीला गेलेला नाही. गेल्या आठवड्यात त्याची डेंग्यूची चाचणी पॉझीटीव्ह आली होती. यानंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यातून बाहेर पडला. शनिवारी पाकिस्तानविरुद्ध रंगणाऱ्या सामन्यापूर्वी गिलची तब्येत सुधारेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, त्याला प्लेटलेट्स द्याव्या लागल्याने तो शनिवारपर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येत आहे.