
अकोला- भाजप विरोधात जे एकत्र येतील त्यांना सोबत घेऊ. प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत आजही सकारात्मक असून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्यातील काही लोकांचा भाजप सोबत जाण्याचा आग्रह होता. सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचा भुजबळांचा प्रस्ताव असल्याविषयी भुजबळ यांनी कबूल केले की, ते खोटं बोलून गेले आहेत.सर्व आमदार फोडून त्यांनी हे राज्य आपल्या हातात घेतल आहे. देशाची जर एकंदरीत यादी बघितली तर 70% राज्यात भाजप नाही. लोकांचा एक समज आहे की, भाजप राज्यात नाही. पण देशात येण्याची शक्यता आहे. पण आता राज्यांची परिस्थिती पाहिली तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काही ना काही परिणाम नक्कीच दिसून येईल.अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच आहे. ईव्हीएम मशीन बद्दल संसदेत तक्रारी आहेत. निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी आहेत. मात्र, उत्तर आलेलं नाही. लोक निवडणुकांच्या जागेबद्दल आम्ही तिघे बसून एकत्रित निर्णय घेऊ. राष्ट्रवादी पक्षात फुट नाही.पक्ष म्हणून आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळाली. पंकजा मुंडे यांनी नवीन पक्ष काढण्याचा विचार मांडला असेल तर मी त्यांचं स्वागत करतो.भाजपची सत्ता नको अशी जनतेची भावना असून बावनकुळे यांना भाजपात किती स्थान हे मागील निवडणुकीत दिसले असे शरद पवार म्हणाले.