
विदर्भातील अनेक शिल्लक जागांवर काँग्रेसने आपली उमेदवारी जाहीर केली आहे यामध्ये उमरेड अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून काँग्रेसने संजय मेश्राम यांना उमेदवारी जाहीर केली. आज सायंकाळी जाहीर झालेल्या यादीत त्यांचे नाव आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. 14 उमेदवारांच्या यादीत विदर्भातील पाच जागांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने संजय मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. तर आरमोरी जागेसाठी मसराम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
पक्षाने पहिल्या तीन याद्यांमध्ये एकूण 87 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. आता पक्षाच्या एकूण उमेदवारांची संख्या 100 झाली आहे.