
-नागपूर जिल्यातील ग्रामीण भागात ओबीसी जागर यात्रेचे स्वागत.
नागपूर -भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत झाले. पारशिवनी, भानेगाव, खापरखेडा, दहेगाव रंगारी, सावनेर, मोहपा, कोहळी, मेंढेपठार, कचारी सावंगा, रिधोरा, काटोल, पारडसिंगा या ठिकाणी जनसंपर्काच्या माध्यमातून ओबीसी जागर यात्रेचा उद्देश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, सहसंपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण, प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने ही ओबीसी जागर यात्रा महाराष्ट्र भ्रमण, जनजागृतीसाठी निघाली आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या प्रत्येक घटकांना फायदा होणार आहे. ओबीसी समाज प्रगत व्हावा, हीच भाजपाची प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच, भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा, हा आमचा मूलमंत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षात देशाच्या विकासाचे मोठे काम केले. केंद्रात ३०% खासदार/मंत्री ओबीसी आहेत, तसेच राज्यात ४०% आमदार ओबीसी आहेत. मोदीजींनी ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन केले. ओबीसी तरुण-तरुणींना युपीएससी, एमपीएससी, तलाठी, जिल्हाधिकारी पदांमध्ये स्थान मिळावे, म्हणून शासनाने विविध योजना सुरु केल्या. ओबीसी विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घेण्याची संधी भाजपाने उपलब्ध करून दिली याकडे ओबीसी मोर्चा प्रमुख संजय गाते यांनी लक्ष वेधले. ओबीसींसाठी वैद्यकीय शिक्षणात आरक्षण आणि नि:शुल्क वसतिगृहाचा लाभ भाजपा सरकारने मिळवून दिला आहे. या योजना घरोघरी पोहचवाव्यात, जेणेकरून ओबीसी समाजाची प्रगती होईल. भाजपा ओबीसींचा आणि ओबीसी भाजपाचा हा आमचा मूलमंत्र असून ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. मराठ्यांना ओबीसींचे सरसकट दाखले देऊ नये. ओबीसींचे आरक्षण कमी न करता मराठ्यांना वेगळे आरक्षण मिळावे, ही आमची भूमिका आहे. भाजपा ओबीसी आरक्षणाचा एक टक्कादेखील कमी होऊ देणार नाही. आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाही, असे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी केले.
ओबीसी जागर यात्रेची सुरुवात ०२ ऑक्टोबर २०२३ ला हिंगणघाटपासून झाली असून यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा हा मार्ग राहील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे १२ ऑक्टोबरला होईल. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा फिरणार आहे.