
नागपूर (nagpur), 26 मार्च, 2025 – मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नागपूर होरायझनने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंट (एआयआयएलएसजी), नागपूरला सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन दान केले आहे. मुलींच्या टॉयलेट ब्लॉकमध्ये ही सुविधा बसवण्यात आली असून ती आता वापरासाठी खुली करण्यात आली आहे.
यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटेरियन श्री राजिंदरसिंग खुराना यांच्या हस्ते व्हेंडिंग मशीनसोबत रोटरीच्या फोर-वे टेस्ट बोर्डचेही अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ नागपूर होरायझनचे अध्यक्ष देवयानी शिरखेडकर, कोषाध्यक्ष धीरज गौरखेडे, पर्यावरण संचालक सुनील बानुबाकोडे, विजय अंबुलकर, कर्नल मुकेश शहारे, वरिष्ठ प्राध्यापक कर्नल डॉ.ए.आर. शृंगारपुरे, डॉ.भूषण लाखकर, डॉ. अपरूप अडवाडकर, दिनकर निंबाळकर, आणि सुषमा चटर्जी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजिरी जावडेकर यांनी केले, तर एआयआयएसजीचे प्रादेशिक संचालक जयंत पाठक यांनी रोटरी संघाचे स्वागत केले.