अमरावती : आळंदी येथे काल वारकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा क जिल्हा काँग्रेसच्या वतीने राजकमल चौकामध्ये जोरदार घोषणाबाजीसह निषेध करण्यात आला.राज्याच्या इतिहासात हा काळा दिवस असून 300 वर्षाच्या परंपरेत पहिल्यांदा आळंदीत हा लाठीमार वारकरी संप्रदायावर करण्यात आला त्यामुळे इतिहासाला काळिमा फासणारा हा प्रकार असून याचा जनता हिशोब घेतल्या शिवाय राहणार नाही शिंदे फडणवीस सरकारला याचे उत्तर द्यावं लागेल अशी टीका माजी मंत्री व काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनी यानिमित्ताने केली
वारकऱ्यांवरील लाठीचार्जचे पडसाद बुलढाण्यात; सकल वारकऱ्यांकडून निषेध आंदोलन
बुलढाणा – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात काल वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.यासंदर्भात बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या सदस्यांनी कीर्तन करत निषेध आंदोलन केले. स्थानिक पोलीस प्रशासन आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आणि शिव वारकरी सेना तसेच सकल वारकरी मंडळ यांनी निषेध व्यक्त करत केली आहे.