
मुंबईः भोसरी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नियमित जामीन मंजूर झाला आहे. भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात गुरुवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
भोसरी कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात एसीबीने दाखल गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली होती. खडसे म्हणाले, ईडीने केलेली कारवाई चुकीची असल्याचे मत आम्ही कोर्टात मांडले. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास असून जामीन मंजूर झाला आहे.