
नागपूर – साप्ताहिक वृत्तनामाचे संपादक दैनिक सुपर भारत चे निवासी संपादक दैनिक केसरी चे ब्युरोचीफ तथा प्रा. नरेंद्र वैरागडे Editor of Weekly News Daily Daily Super Bharat Resident Editor Daily Kesari Bureau Chief and Prof. Narendra Vairagade यांची महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या नागपूर शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, प्रदेश महासचिव एड. श्याम खंदारे, विदर्भ विभाग प्रमुख मनोहर शहारे, नागपूर शहर प्रमुख जयंत साठे, नागपूर जिल्हा महासचिव शालिक जिल्हेकर, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद पाटील, नागपूर शहर सचिव जगदीश राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.Prof. Editor Narendra Vairagade elected as Nagpur City Working President of Maharashtra Kalavant Nyaya Haq Samiti
नरेंद्र वैरागडे हे एक झुंजार पत्रकार असून त्यांनी आपल्या विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित, बहुजन समाजातील उपेक्षित बांधवांना न्याय देण्यासाठी त्यांनी आपली लेखणी झिजविली होती. त्यांनी बराच काळ बॅचलर ऑफ जर्नालिझमच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे सुद्धा काम केलेले आहे. ते नागपूरातील एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीचे सुद्धा संपादक आहेत. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.