
नागपुर (Nagpur) :-
नुकतीच हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे आयोजित सब-ज्युनियर हँडबॉल स्पर्धेची चाचणी पार पडली. या स्पर्धेत नागपूरकर विद्यार्थिनीने आपले कौशल्य सिद्ध करत महाराष्ट्र टीममध्ये स्थान मिळवले आहे. सी. पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटी संचालित प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर येथील विद्यार्थिनी मनस्विनी हरडे हिची निवड सब-ज्युनियर गर्ल्स महाराष्ट्र हँडबॉल टीमसाठी करण्यात आली आहे. या यशामुळे शाळेचे नाव अभिमानाने उंचावले असून संपूर्ण शैक्षणिक परिवारात आनंदाचे वातावरण आहे.
मनस्विनीच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच हँडबॉल प्रशिक्षक ओमप्रकाश शाहू यांनीही तिच्या मेहनतीचे कौतुक केले. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मनस्विनीवर अभिनंदनाचा वर्षाव करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.मनस्विनीच्या या यशामुळे केवळ शाळेलाच नाही तर संपूर्ण शहरालाही अभिमान वाटत आहे. तिच्या जिद्दीला, चिकाटीला आणि मेहनतीला मिळालेला हा सन्मान भविष्यातील मोठ्या यशाचा पाया ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे..