अत्यावश्यक कामामुळे ‘या’ भागातील वीजपुरवठा राहणार बंद

0
xr:d:DAF3CfgwTUI:1167,j:274017274839988743,t:24040210

नागपूर (nagpur), दि. 13 मे 2025: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महत्त्वाकांक्षी पुल उभारणीच्या कामात अडथळा होत असलेली वीज वाहिनी स्थलांतरित करण्यात येणार असल्याने गांधीबाग परिसरातील वीज पुरवठा उद्या (बुधवार, दि. 14 मे 2025) सकाळी 7 ते 11 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुल उभारणीच्या कामात 11 केव्ही लाल इमली वीज वाहिनी अडथळा ठरत असल्याने, तिचे स्थलांतरण करणे अत्यंत आवश्यक आहे. हे अत्यावश्यक काम उद्या महावितरणच्या वतीने करण्यात येणार आहे.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, या वाहिनीच्या स्थलांतरणामुच्या कामामुळे उद्या सकाळी 7 ते 11 या वेळेत डागा हॉस्पिटल आणि मागील परिसर, गोळीबार चौक, नांदबाजी डोब, हंसापुरी खदान, नाल साहाब चौक, गांजाखेत चौक इत्यादी भागांतील वीज पुरवठा खंडित राहील.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या महत्वाच्या कामात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी हे स्थलांतरण गरजेचे असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. या कामामुळे ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली असून, वीज पुरवठा खंडित असताना नागरिकांनी सहकार्य करावे, असे नम्र आवाहन केले आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर