
नागपूर -काल शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर क्षतीग्रस्त घरांच्या पंचनामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या महसूल कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी Dr. Vipin Itankar डॉ. विपीन इटनकर यांनी आज सकाळी बैठक घेतली.Deputy Chief Minister Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
शनिवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा मुख्यालयी बैठक घेतल्यानंतर प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. काल व आजही सकाळपासून पाऊस नसल्याने अनेक भागातील पाणी ओसरले असून सर्वेक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. आज दुपारपासून मनपाचे टॅक्स कलेक्टर व महसूल विभागाचे तलाठी शहरी भागातील पंचनाम्याची सुरुवात करणार आहेत. ग्रामिनमध्ये नागनदीच्या किनाऱ्यावर अनेकांना तडाखा बसल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे. या अतिवृष्टीमुळे वेणा नदीच्या पुरामुळे हिंगणा तालुक्यातील अनेक गावाना फटका बसला आहे.