

सचिव गुरसिमरन कौर, तर रवी किशनपुरिया कोषाध्यक्ष
नागपूर (Nagpur)
शहरातील सर्वात जुन्या अशा लाॅयन्स क्लब ऑफ नागपूरच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच एका बैठकीत निश्चित करण्यात आली. यात अध्यक्षपदी निधीश सावरकर यांची निवड करण्यात आली असून, सचिव पदावर गुरसिमरन कौर शिवहरे यांची, तर कोषाध्यक्ष पदावर रवी किशनपुरिया यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
अध्यक्ष निधीश सावरकर
कोषाध्यक्ष रवी किशनपुरिया
सचिव गुरसिमरन कौर शिवहरे
क्लबचे माजी अध्यक्ष विनोद गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील, अन्य माजी अध्यक्षांचा समावेश असलेल्या एका निवड समितीने नामनिर्देशित केलेल्या कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांच्या नावांना हाॅटेल दर्शन टाॅवर येथे नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत मंजुरी देण्यात आली.
यंदाच्या नूतन कार्यकारिणीत, वरील पदाधिकाऱ्यांशिवाय, पूर्व अध्यक्ष सचिन अग्रवाल, उपाध्यक्ष रवींद्रसिंग खुराणा, विनोद गुप्ता, सहसचिव सुनील कुहीकर, सह कोषाध्यक्ष सागर शिवहरे, संचालक विघ्नेश बिलसे, डॉ. शिरीष चांडक, राजकुमार अग्रवाल, प्रकाश वाघमारे, रजनीश जैन, किशोर भैय्या, संगीता किशनपुरिया, विनीत सोंधी, सल्लागार गिरीश व्यास, संजय गुप्ता, जयप्रकाश गुप्ता यांचा यात समावेश आहे.
याशिवाय, झिया शेख, किशोर कुंजीकर, शरद जेजानी, चेतन मारवा, नितीन शर्मा, उमेश महतो, सतिश जैन, विजय फरकासे प्रभृतीही विविध पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पुढील काळात संपन्न होणार असून, नवे अध्यक्ष निधीश सावरकर, सचिव गुरसिमरन कौर शिवहरे, रवी किशनपुरिया यांचे या सभेत स्वागत व अभिनंदन करण्यात आले.