
भंडारा – जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा जवळजवळ पूर्णत्वास आला असला तरी गोसी प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या आजही कायम आहेत. आ.बच्चू कडू यांनी प्रकल्पग्रस्त लोकांच्या मजबुरीचा लाभ राजकारणाकरिता घेण्यात कसलीही कसर सोडली नाही. या मुद्द्यावर त्यांनी महायुती सरकारच्या काळात जलसंपदा सारखे मंत्री पद तर मिळवून घेतले, परंतु प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवून देऊ शकले नाहीत. तसेच सध्याच्या महायुती सरकारमध्ये सुध्दा आ. बच्चू कडू यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असताना आ. कडू हे नेहमीच राज्य सरकार विरोधात वक्तव्य करीत असतात. याचा विरोध म्हणून आज बच्चू कडू भंडारा येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी कार्यक्रमाकरिता आले असता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. कडू यांचा निषेध नोंदविला.