२२ ऑक्टोबरनंतर आंदोलनाची पुढील दिशा – मनोज जरांगे पाटील

0

 

जालना : आंतरवाली सराटीतील सभेसाठी 7 कोटी रुपये लागल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला. या सभेत हिंसाचार होईल म्हणून मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी अँड गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. या वक्तव्याचा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना समज द्यावी असे जरांगे म्हणाले, अंतरवाली सराटी येथे आयोजित सभेत जरांगे बोलत होते. आजच्या जनसागराने मराठ्याची ताकद शासनाला दाखवून दिली आहे.
२२ ऑक्टोबरनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असून महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त समितीला पाच हजारावर कागदपत्रांचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता समितीचे काम बंद करून तात्काळ मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर करीत आरक्षण द्यावे. आता आमची वाट पाहण्याची क्षमता नाही. पुढील दहा दिवसात निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.