
नागपूर -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्याद्वारे छापलेल्या नवीन वर्षाच्या (2023) कॅलेंडरमध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठलाच्या चित्रासोबत बकरा व मस्जिदचे चित्र छापून असंख्य हिंदू धर्मीय लोकांचा अपमान केला असा आरोप करीत भाजयुमोने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा शहराचे महामंत्री सचिन करारे यांच्या नेतृत्वात आणि युवा मोर्चा पूर्वचे अध्यक्ष सन्नी राऊत यांच्या उपस्थितीत शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दुनेश्वर पेठे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या करिता निवेदन देण्यात आले. यावेळी एजाज शेख, आशीष मेहर, अन्नू यादव, विकास रंहागले, शुभम पथाले, नितिन इटनकर, गोविंदा काटेकर, जयेश बिहारे, रित्रिक कापसे, शैलेश नेताम, कपिल लेंडे, शंकर विश्वकर्मा व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.BJP Aggressive Against Duneshwar Pethe, Statement to Commissioner