नवाब मलिकांच्या जामीनाला ३ महिन्यांची मुदतवाढ

0

मुंबई  MUMBAI : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik Bail extended for 3 months) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. त्यांचा जामीन न्यायालयाने तीन महिन्यांची वाढविला आहे. मनी लाँडरिंग अर्थात पैशाच्या अफरातफर प्रकरणात नवाब मलिक तब्बल दीड वर्ष कारागृहात होते. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना ११ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर झाला होता. या जामीनाला आता सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिलीय.
फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबाद येथील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
अलिकडे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचीही चर्चा आहे. निवडणूक आयोगापुढे अजित पवार गटाने ४२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यात नवाब मलिक यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.