राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहरतर्फे गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन

0
नागपूर : दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर तर्फे विविध सामाजिक व ऐतिहासिक महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
             राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गांधीजींच्या सत्य, अहिंसा व बंधुतेच्या विचारांचे स्मरण या वेळी करण्यात आले.
                यानंतर माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शास्त्रीजींच्या “जय जवान, जय किसान” या घोषणेचा आजच्या काळातील संदर्भही या कार्यक्रमात मांडण्यात आला.
              धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. त्यांच्या सामाजिक न्याय, बंधुता, समता आणि प्रबोधन या संदेशांचे स्मरण करून सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजहितासाठी एकत्र येऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
              या प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच समाज व देशाची खरी प्रगती शक्य आहे. त्यांच्या शिकवणीप्रमाणे कार्य करणे हेच आपले कर्तव्य आहे या सर्व कार्यक्रमाचे आयोजक किरण नंदनवार, महेश अंबरवाडे, समीर रहाटे अरविंद ढेंगरे, यांनी केले होते.
  या तिन्ही कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराध्यक्ष श्री. अनिल अहिरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाडे, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, महिला अध्यक्षा सुनीता येरणे, विशाल खांडेकर, आनंद सिंग,  लक्ष्मी सावरकर तानाजी वनवे बजरंग सिंह परिहार जानबा मस्के, बंटी मुल्ला, मोंटी गंडेचा, राजू मिश्रा,  लक्ष्मीकांत पांडे, राजेंद्र भोयर, भरत शर्मा, ब्रह्मानंद मस्के, रविंद्र वाठ, कपिल नारनवरे, शोभा येवले, कनिजा बेगम , यशस्वी बनसोड, अंजुम शेख श्रद्धा राऊत, ज्योती  कावरे, उत्कर्ष गाडबैल, संतोष भुजाडे, मनोज जरेल, प्रज्ञाशीला ताई घाटे, प्रभुदासजी तायवाडे, चंद्रकांत भोयर., विनोद शेंडे,  प्रभाकर गोस्वामी,  राजूभाऊ मुन, संजय पाटील, अनिकेत रंगारी, कीशोर चिवंडे, पराग तरटे, बंडू मडके, कमलेश मेश्राम, नरेश लोखंडे, कपिल नारनवरे, नामदेव शंभरकर, धिरज भंडारी,
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते