NANA PATOLE भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का ? नाना पटोलेंचा सवाल

0

 

नागपूर NAGPUR  -संभाजी भिडे SAMBHAJI BHIDE यांचे महापुरुषांबद्दलचे विधान नेहनीच अवमानकारक असतात. BJP भाजपला भिडेंच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवायचा आहे का ?असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. संभाजी भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी आपण आधीच विधिमंडळात केली आहे याकडे लक्ष वेधले.
सावित्रीबाई फुलेंबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्याला जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना फाशी देणार का? असाही सवाल माध्यमांशी बोलताना केला.पटोले म्हणाले,भीमा कोरेगाव घटना घडली, त्यासाठी भिडे जबाबदार होते.दोन तीन दिवसात भिडे यांना अटक केली नाही तर आम्ही विधिमंडळात हे प्रश्न उचलून धरल्याशिवाय राहणार नाही. मुळात भाजप भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मनिपुर करू पाहत आहे का? अशी भीती अनेकांना वाटते. नरेंद्र मोदी खाजगी पुरस्कार स्वीकारत आहेत. मोदी असे पुरस्कार स्वीकारून पंतप्रधान पदाचा अवमान करत आहेत. दरम्यान, काँग्रेस भाजप विरोधात कायम लढा देत आहे. शरद पवार यांचे नाव न घेता इतर पक्षांनी काय करावे, हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे भाजप विरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे. मात्र, दुसऱ्या पक्षांनी काय करावे? हे त्यांचे त्यांनीच ठरवायचे आहे.

नागपुरात विकासाच्या नावावर शहर भकास केले. भाजपने नागपुरात झाडे कापली, सौंदर्य नष्ट केले. मला चंद्रपूर माहीत आहे. गेल्या दोन वर्षांत पूररेषा ओलांडून एकही घर बांधलेले नाही.

भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणाचे बांध बांधले, त्यामुळे महाराष्ट्रात पूर येत आहे. नानार जवळ अनेकांनी जमिनी घेतल्या आहेत. जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल.हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी, गुजरात मधील लोकांनी तिथे जमिनी घेतल्या आहेत. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे.नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांचे नाव शासनाने जाहीर करावे. त्यांच्या कडे यादी आहे असे आव्हान दिले.

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था योग्य नाही. फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातही लोकं सुरक्षित नाही. नागपुरात एका दिवसात चार लोकांची हत्या झाली. महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहेत, त्यांची उगीच परीक्षा घेऊ नका. अन्याय होणार नाही असे केवळ सांगतात विरोधी लोकप्रतिनिधी यांना पुरेसा निधी दिला नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा नाना पटोले यांनी दिला.

जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून निषेध आंदोलन

अमरावती : जिल्ह्यातील बडनेरा येथिल एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक विधान करुन त्यांचा अपमान केला. भिडेंच्या या वक्तव्याचा तिव्र निषेध करण्यासाठी आज शहरातल्या गांधी जवाहर बाग येथे निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

संभाजी भिडेंची स्मृती भ्रष्ट झाली आहे – आ. संजय गायकवाड

बुलढाणा – देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. भिडे गुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे आ संजय गायकवाड यांनी देखील संतप्त प्रतिकिया दिली. वयाप्रमाणे भिडे गुरुजी यांची स्मृती भ्रष्ट झाली असल्याने अशा प्रकारचे विधाने त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहेत. अशा प्रकारचे विधाने करून पुन्हा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं होत आहे. मात्र, अशा विधानाला ना शिवसेना, ना भाजप महत्व देत. ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकते, अशी प्रतिक्रिया आ. संजय गायकवाड यांनी दिली आहे. मात्र, काल विरोधी पक्षाने सभागृहात कारवाईची मागणी केली असल्याचे म्हणाले .

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ संतप्त

बुलढाणा- महात्मा गांधी यांच्याबद्दल शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरात राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. जेव्हा पासून मोदी नावाची विकृती या देशावर राज्य करत आहे तेव्हापासून भिडे गुरुजी नावाचा जंतू महाराष्ट्रात वळवळ करत आहे. खर पाहिलं तर आरएसएस व त्यांच्या कुशीतील सर्व हिंदुत्वाचे खरे शत्रू असल्याची घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आरएसएस व मोदी सरकारवर केली आहे. केंद्रातील व राज्यातील सरकारचा भिडे हा पोपट आहे, भिडेंच्या माध्यमातून राज्य व केंद्रातील सरकारचा अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोप देखील माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.