Nagpur : माझी मराठी अभिजात झाली

0

यशस्वी पणे कार्यक्रम आयोजित

Nagpur :नुकतेच मराठी साहित्य मंडळ नागपूर विभाग तर्फे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे साजरे करण्यासाठी ‘ माझी मराठी अभिजात झाली (सन्मान माझा अभिमान माझा ) ‘ हा सुंदर कार्यक्रम रजनी gandha हॉल, आठ rasta चौक येथे घेण्यात आला. विदर्भ प्रांतपाल डॉ. प्रविण उपलेंचवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात मराठी भाषेच्या अभिजात होण्याचे फायदे ,त्या मागील इतिहास ,गौरव ,सन्मान ,अभिमान या सर्व बाबि संवाद ,कविता व गीत या तिन्ही प्रकार द्वारे विविध नामवंत साहित्यिकांनी सादर केले. यात प्रमुखपणे सादर करणारे साहित्यिक सना पंडित ,धनश्री पाटील रेखा जगनाडे ,ज्योती नागपूरकर, प्रणाली चव्हाटे , भुरे ,उषा राऊत, मुकेश वानखेडे, अनिता मसराम, नीता चिकारे , डॉ हिरालाल मेश्राम ,विकास गजापुरे ,डॉ रमणीक लेनगुरे व इतर या सर्वानी आपल्या खास शैलीने संवाद, कविता किवा गीत सादर करून कार्यक्रमात मजा आणली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ इंजि प्रविण उपलेंचवार यांनी ,कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा नरेंद्र मोहिते ( पूर्व विदर्भ अध्यक्ष) व कार्यक्रमा चे सुंदर संचालन रत्नाकर मुळीक ( जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी केले. कार्यक्रमात परिणीता मातूरकर ( शहर अध्यक्ष ) व संचालक Rajanigandha संगीत अकादमी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

 त्यांनी एक खास गीत पण सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ जयप्रकाश घुमटकर ( राष्ट्रीय अध्यक्ष ) व सिद्धार्थ कुलकर्णी ( मुंबई महानगर अध्यक्ष ) यांच्या मार्गदर्शन खाली मराठी मंडळ नागपूर विभागाचे सारे पदाधिकारी व मनीष उपाध्ये ( जिल्हा सचिव ) व इतर सर्वानी खूप मेहनत घेतली व एक आगळा कार्यक्रम सुंदररित्या साजरा झाला.