प्रेम प्रकरणातून युवतीची हत्या, 24 तासात आरोपीचा छडा

0

वर्धा  WARDHA – वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील जयभीम वॉर्डमध्ये राहणाऱ्या युवतीची प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. भरदिवसा युवकांनी युवतीच्या घरात शिरून वायरने गळा दाबून हत्या केली. शामल उत्तम वैद्य वय 21 वर्ष ही युवती नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला यवतमाळला शिक्षण घेत होती. यवतमाळवरून ती गावात आली होती. दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना आरोपी युवक, आरोपी आशिष आडाऊ, जि.यवतमाळ हा घरात घुसला व तू माझ्याशी का बोलत नाही असा वाद घालीत तिचा गळा वायरने आवरून तिला मारून टाकले. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहूले यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करीत 24 तासातच या प्रकरणाचा छडा लावत आरोपी आशिष आढाऊ याला धामणगाव येथून अटक करण्यात आली. विविध कलमासह आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक युवतीचे व आरोपीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते घरच्यांना ते माहीत झाले होते. त्यामुळे तिला गावात आणले होते आरोपीचे व युवतीचे बोलणे गेल्या काही दिवसापासून बंद झाले होते. आरोपीने तू माझ्याशी का बोलत नाही तिच्यावर संशय घेत तिचा गळा आवळून तिला मारून टाकले अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास अल्लीपूर ठाणेदार प्रफूल्ल डाहूले करीत आहेत