
नागपूर(Nagpur):-संस्कृत सखी सभा आणि नटराज आर्ट अॅन्ड कल्चर सेंटर, धर्मपेठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “मेघदूत अंतीयाक्षरी स्पर्धा” दिनांक २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सुप्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास यांच्या ‘मेघदूत’ या काव्यावर आधारित असून त्यातील श्लोकांवर अंतीयाक्षरी पद्धतीने ही सृजनात्मक स्पर्धा घेतली जाणार आहे.
संस्कृत सखी सभा हा संस्कृतप्रेमी महिला सभासदांचा एक ऑनलाईन समूह आहे, जो विविध उपक्रम राबवून संस्कृत संवर्धनाचे कार्य करत आहे. या स्पर्धेच्या आयोजनात सौ. कीर्ती मराठे, सौ. कल्पना रोडे, सौ. अनुश्री जोशी व डॉ. भारती पाळके यांचा सक्रिय सहभाग आहे.
या अंतीयाक्षरी स्पर्धेसाठी ३ गट तयार करण्यात आले आहेत :
हेमंत गट (सदस्य ९): सौ. वैशाली देवतळेकर, सौ. शीतल वनकर, सौ. कल्पना नवलेकर, सौ. योगिता बोबडे, सौ. सुनीता झाडे, सौ. माधवी पिंगळेकर, सौ. प्रतिभा टिपे, सौ. चंचल शेट्ये, सौ. गीता देव.
वसंत गट (सदस्य ३): सौ. मृणालीनी दीक्षित, सौ. उल्का फेशकर, सौ. प्रिया देशमुख.
शिशिर गट (सदस्य ७): अमया कुलकर्णी, स्नेहा एदगुंडेकर, रुचिता खोंडे, संजना आत्राम, संजना आंबेकर, सुप्रिया वानखडे, सौ. शीतल नाईकवाड.
या स्पर्धेसाठी विविध विषयांवर आधारित चार फेऱ्या असणार आहेत, जसे की – मेघदूत, कुमारसंभव, ऋतुसंहार आणि सुभाषिते.
या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून डॉ. वीणा गांगु आणि डॉ. प्रिया थेंगडकर असतील. कार्यक्रमाचे आयोजन नटराज आर्ट्स अॅण्ड कल्चर सेंटरतर्फे डॉ. रवी हर्डस यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.