छत्रपती संभाजी महाराजांना महावितरणचे विनम्र अभिवादन

0

नागपूर (NAGPUR), दि. 14 मे 2025: हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी आणि पराक्रमी युवराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) च्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

महावितरणच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ येथे आयोजित कार्यक्रमात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विधी सल्लागार सुनिल उपाध्ये, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरण आणि महानिर्मितीच्या अनेक अधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केले.