
नागपूर(Nagpur), दि. 26 जून 2025: – सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित, अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणा-या तसेच राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम करतांना जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देण्यास प्राधान्य देणाऱ्या, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देणा-या राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.
महावितरणच्या काटोल मार्गवरील विद्युत भवन कार्यालयात झालेल्या या जयंती कार्यक्रमाच्यावेळी महावितरण़च्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी महानिर्मितीचे उपमुख्य अभियंता अंकुर जोशी, अधीक्षक अभियंता किशोर सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता सतीश भामसे, महावितरणचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव. कार्यकारी अभियंता विजय तिवारी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रविण काटोले, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरण व महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राजर्षी शाहु महाराज यांना अभिवादन केले.
फ़ोटो ओळ – राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतांना महावितरण व महानिर्मितीचे अधिकारी व कर्मचारी
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर