एफडीआयमध्ये महाराष्ट्र पुन्हा पहिल्या स्थानावर: देवेंद्र फडणवीस

0

 

मुंबई: थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती (Maharashtra is Number 1 Again, in FDI )दिली आहे.
फडणवीस यांनी नमूद केले की, आम्ही सातत्याने सांगत होतो की खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवे सरकार आले आहे. आणि आता महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर वन होणार. आता
डीआयपीपीने जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीचा जो अहवाल जारी केला, त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय (परकीय गुंतवणूक) प्राप्त करणारे राज्य ठरले आहे.
29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक 24 टक्क्यांसह दुसर्‍या तर गुजरात 17 टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट च्या माध्यमातून दिली आहे.