jack dorsey भारताने फेटाळले जॅक डॉर्सीचे खोटे आरोप

0

राजीव चंद्रशेखर Rajeev Chandrasekhar यांनी केला जॅकचा भंडाफोड

 

 

नवी दिल्ली NEW DELHI 13 जून : सोशल मिडीया प्लॅटफॉर्म असलेल्या twitter ट्विटरचा माजी सीईओ jack dorsey जॅक डॉर्सी याने केलेल्या आरोपांचे भारताने खंडन केले आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर Rajeev Chandrasekhar  यांनी जॅकचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ट्विटर कडून त्यावेळी करण्यात आलेल्या नियमभंगांची माहिती राजीव चंद्रशेखर यांनी दिली.

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी एका मुलाखतीत भारताच्या विरोधात दडपशाहीचे आरोप केले होते. तसेच भारताची तुलना थेट तुर्कस्थानशी केली होती. या मुलाखतीत जॅक डॉर्सी म्हणाला होता की, भारतात 2 वर्षापूर्वी केंद्र सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु होते. या आंदोलनावेळी ट्विटरवर अनेक वापरकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात पोस्ट केल्या. त्यावेळी ट्विटरला भारतातून अनेक विनंत्या मिळाल्या होत्या, ज्यात शेतकरी आंदोलन कव्हर करणारी खाती ब्लॉक करण्यास सांगितले होते. यासोबतच आंदोलनासाठी सरकारला विरोध करणारी खातीही बंद करण्याच्या मागण्या करण्यात आल्या होत्या, असा दावा डॉर्सी यांने केला.

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांन डॉर्सी यांच्या आरोपांचे खंडन केले. यासंदर्भात केंद्रीय मंत्री म्हणाले की, जॅक डॉर्सी यांनी धाधांत खोटे वक्तव्य दिले आहे. ट्विटरच्या इतिहासातील कदाचित संशयास्पद भाग पुसण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डॉर्सी आणि त्यांच्या टीमने सातत्यानं भारतीय कायद्याचे उल्लंघन केले होते. ट्विटरने 2020 ते 2022 पर्यंत भारतीय कायद्यांचे पालन केले नाही. परंतु, यादरम्यान कोणताही ट्विटरचा अधिकारी तुरुंगात गेला नाही किंवा ट्विटरवर बॅनही लावला नाही. डोर्सी यांच्या काळात ट्विटरला भारतीय कायद्याचे सार्वभौमत्व स्वीकारण्यात अडचण आली होती असे प्रत्युत्तर राजीव चंद्रशेखर यांनी दिले.