मी कोणासोबत जाणार नाही, लोकांच्या सोबत राहणार -आ बच्चू कडू

0

 

अमरावती -मेरा देश, मेरा खून या अभियानाची सुरुवात करत आहोत दुसरा टप्पा आमचा अयोध्या राहणार प्रभू रामचंद्रच्या चरणी पूजा करणार
तेथून देशाच्या शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये अशी प्रार्थना करणार, हिंदू आणि मुस्लिम दोघेही शहीद झाले होते.29 ऑक्टोबरला आम्ही अयोध्येला जाणार आहोत.
मात्र, उद्धव ठाकरे सोबत जाणार का या प्रश्नाचे उत्तरात मी कोणाच्या सोबत जाणार नाही. लोकांच्या सोबत राहणार असे स्पष्ट केले.
ठाकरे समाजवादी बैठक संदर्भात छेडले असता हे सर्व राजकारण आहे
राजकारणात काहीही शक्य आहे
शिवसेना मुस्लिम लीगसोबत आली मग समाजवादी सोबत जाण्यास काय हरकत आहे.खुर्चीसाठी काही पण कधी पण होऊ शकते. देवेंद्रजी म्हणाले होते नाही, नाही नाही. पण शेवटी राष्ट्रवादी सोबत करावंच लागलं
राजकारणात मी कुठे जाणार नाही असं म्हणता येणार नाही देवेंद्रजी यांच्या लक्षात आलं नसेल, राग असेल म्हणून ते बोलले असतील,कुंवारा राहील पण लग्न करणार नाही. मात्र वरून आदेश आला असेल अमित शाह म्हणाले असतील. अब कुंवारे मत रहो..असा टोलाही कडू यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.
मुनगंटीवार साहेब वाघनखं आणायला गेले नखं तर आणली नाहीत,50, 60 लाख खर्च केले हे फोनवर सुद्धा करता आलं असते, नखांसोबत इंग्रजानी लूटलेले पैसे देखील आणले पाहिजे अशी मागणी केली.