

परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले तीन उदाहरणं
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना ग्लोबल साउथला भारताकडून खूप विश्वास आणि अपेक्षा आहेत. असे का हे सांगण्यासाठी तीन उदाहरणेही दिली. जयशंकर म्हणाले की, कोरोनाच्या काळात ग्लोबल साउथच्या बहुतेक देशांना भारताकडून पहिली लस मिळाली.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर शनिवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी भारताचं वाढतं वर्चस्व आणि ग्लोबल साउथमध्य भारताची भूमिका आणि इतरांना असलेली भारतापासून अपेक्षा याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, इतर देशांचा भारतावर प्रचंड विश्वास आहे. यासाठी त्यांनी तीन उदाहरणे दिली, ज्यात त्यांनी G-20 शिखर परिषद, कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्ध आणि आफ्रिकन युनियनचे सदस्यत्व याबाबत उल्लेख केला.
एस. जयशंकर यांनी सांगितले की, ‘ग्लोबल साऊथ म्हणजे काय? आमचा अर्थ असा होतो की जे देश वसाहती होते, ज्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळाले किंवा जे अजूनही विकसित होत आहेत, जे मोठ्या प्रमाणात कमी उत्पन्न असलेले देश आहेत. ग्लोबल साउथचे देश भारतावर खूप विश्वास ठेवतात. आशा बाळगतात. त्यांचा (ग्लोबल साउथच्या देशांचा) भारतावर खूप विश्वास आहे. त्यांना भारताकडून आशा आहेत आणि त्यामागे एक कारण आहे. मी तुम्हाला तीन उदाहरणे देऊ शकतो.
जयशंकर पुढे म्हणाले, ‘ग्लोबल साउथमधील बहुतेक लोकांना आठवत असेल कोविडच्या काळात, जेव्हा विकसित जग प्रत्यक्षात लसींचा साठा करत होते, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांना त्यांची पहिली लस भारतातून मिळाली.
परराष्ट्र मंत्री म्हणाले, ‘दुसरे उदाहरण म्हणजे युक्रेन… तिसरे उदाहरण आमच्या G20 दरम्यान पाहायला मिळाले. अनेक वर्षांपासून आफ्रिकन युनियनला G20 मध्ये जागा हवी होती. प्रत्येक G20 ची सुरुवात झाली की, पहिल्या दिवशी प्रत्येकजण आफ्रिकन युनियनला सांगत होता की काळजी करू नका, आम्ही या बैठकीत तुमची काळजी घेऊ. पण मीटिंगच्या शेवटी काहीही झाले नाही तेव्हा ते म्हणायचे, माफ करा. या वेळी कदाचित नाही पण पुढच्या वेळी आपण नक्कीच विचार करू. पण आफ्रिकन देशांना वाटते की भारताला विवेक आहे. भारताची प्रतिष्ठा आहे, त्याची भूमिका आहे, भारताला आज आत्मविश्वास आहे. भारताने ते करुन दाखवले.
जेव्हा गरीब देश लसीसाठी तळमळत होते. काही निवडक देश लस बनवण्यावर काम करत होते, त्यात भारत देखील होता. त्यावेळी अमेरिकेसारख्या श्रीमंत देशांनी लसीचा साठा केला. एकीकडे गरीब देश लसीच्या पहिल्या डोससाठी तळमळत होते, तर दुसरीकडे हे देश त्यांच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोस किंवा बूस्टर डोससाठी लसीचा साठा करत होते. त्यावेळी भारताने गरीब देशांना मदत केली. त्याने आपल्या नागरिकांसाठी व्यापक लसीकरण सुरू करण्यापूर्वीच अनेक देशांना लसीचा पुरवठा पाठवला. भारताने सर्व देशांना ही लस मोफत पुरवली होती. असं ही ते म्हणाले.