मुसळधार पावसात वीज पडून दुर्दैवी मृत्य झालेल्या कुटुंबियांना शासनाकडून मदत

0

आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते धनादेश वितरित

वर्धा : मागील महिन्यात मुसळधार पावसात भिवापूर येथील ठाकरे कुटुंबीयांवर दुःखाचं डोंगर कोसळला अचानक आलेल्या पावसात वीज पडून अनिल दत्तुजी ठाकरे आणि सौरभ गजानन ठाकरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  घटनेची शासनाने दखल घेऊन त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी चार लाख रुपये आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी वर्धा तहसीलदार संदीप पुंडेकर, नायब तहसीलदार दाबेराव, मिलिंद भेंडे, प्रवीण पाल, प्रविण काटकर यांची उपस्थिती होती. भिवापूर येथील ठाकरे कुटुंबीयांची भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांना शोक व्यक्त आमदार राजेश बकाने यांनी केला.