जम्मू-काश्मिरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन

0

श्रीनगर, 09 जुलै : जम्मू-काश्मिर मध्ये काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असून मुसळधार पावसामुळे डोंगराळभागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत.

सततच्या पावसामुळे काल जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग, मुगल रोड आणि श्रीनगर-सोनमर्ग-गुमारी (एसएसजी) रस्ता भूस्खलनामुळे बंद झाला होता. यानंतर आता लेह-मनाली हा महामार्ग देखील भुस्खलनामुळे बंद करण्यात आला आहे. महामार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून या रस्त्यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्याच्या पाहायला मिळत आहे. हा रस्ता बंद झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात या सततच्या पावसामुळे भूस्खलन झाल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.