आचारसंहितेच्या आधी धनगरांना आरक्षण द्या -दिलीप एडतकर

0

 

अमरावती- धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असताना देखील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी वेळ नाही. मुंबईत बैठका घेऊन ते आम्हाला खेळवत आहे असा आरोप अमरावतीमध्ये धनगर बांधवांनी पत्रकार परिषद घेत केला. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगरांना आरक्षण द्या, अन्यथा भाजपच्या नेत्यांना धनगर समाज रस्त्या रस्त्यात गाठत अद्दल घडवेल असा इशारा
दिलीप एडतकर, धनगर नेते यांनी दिला आहे.