
निफाड NIFAD २५ नोव्हेंबर – पुढील वर्षी होणाऱ्या सर्वच निवडणुकीच्या साठी प्रत्येक बुथवर 51 टक्के मिळावी यासाठी सुपरवारीअरची नेमणूक करण्यात येत असून लवकरच त्यासाठी पुढची तयारी केली जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. CHNDRASHEKHARA BAWANKULE
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते यावेळी त्यांचे मोठे आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना कोणत्याही अडचणीच्या प्रश्नावर ती उत्तर न देता अडचणीचे प्रश्न सर्व टाळून म्हणाले की पुढील निवडणुकीमध्ये भाजपचाच विजय होणार आहे कोणी कितीही मांजर आडवा घातलं तरी त्याचा फायदा होणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
देशामध्ये पुढील वर्षी होत असलेल्या निवडणुका तसेच राज्यामध्ये होत असलेल्या निवडणुका लक्षात घेऊन सुपर वॉरियर ची नेमणूक करण्यात येत आहे त्यांच्या माध्यमातून सरकारने केलेल्या कामकाजाची माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे आणि येणाऱ्या काळात हे सुपर वॉरियर अधिक गतिमान पद्धतीने करणार असल्याचे त्यांनी सांगितले.