
नागपूर (Nagpur), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील लोकप्रशासन विभागाच्या माजी प्रमुख विभागप्रमुख डाॅ. निलिमा देशमुख यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता.१७) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या.
आपल्या शैक्षणिक कारकिर्दित अत्यंत हुशार आणि प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. २००८ ते २०१८ या दरम्यान त्या लोकप्रशासन विभागाच्या प्रमुख होत्या. विभागप्रमुख असताना, त्यांनी आपल्या विभागात अनेक उपक्रम राबविले. याशिवाय राज्य सरकारच्या अनुदानातून सुरू करण्यात आलेल्या महिला अध्ययन केंद्राच्या प्रमुख म्हणून त्यांनी बरेच वर्ष कार्यभार सांभाळला. त्यातून त्यांनी महिलांसाठी उपयुक्त असे काम केले. याशिवाय अधिसभा सदस्य, विद्वत परिषदेच्या त्या सदस्य म्हणूनही त्यांनी काम बघीतले.
विशेष म्हणजे, महिलांच्या लैंगिक समस्या विषय असलेल्या सेक्युअल हॅराॅसमेंट सेलच्या त्या प्रमुख होत्या. यादरम्यान त्यांनी अनेक निकालही दिले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंबाझरी घाट येथे अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्यामागे भाऊ भाऊ शेखर पारसे, हिमांशू यारदी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.