
नांदेड NANADED -मराठा आणि धनगर समाजाच्या Maratha and Dhangar society आरक्षणाला विरोध असल्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची पत्रे सोशल मिडियावर व्हायरल झाली असून ती बनावट असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली असून आपली बदनामी केली जात असल्याचा दावा केला आहे.
मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी त्यांच्या नावाची दोन बनावट पत्रे तयार करण्यात आली आहेत. यासंबंधीची तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली आहे. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही एक पत्रही लिहिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाने हे पत्र लिहण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले. चव्हाण यांचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे लेटरपॅड वापरून मराठा आरक्षणाविरोधीचे पत्र व्हायरल करण्यात आले होते. याबाबत 20 फेब्रुवारी 2023 रोजी अशोक चव्हाणांनी दिलेल्या तक्रारी नुसार नांदेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा असाच प्रकार घडला आहे. आपल्या राजकीय विरोधकांकडून हा प्रकार सुरू असून आपल्या विरोधात आणखी काही षडयंत्र रचण्यात आल्याची शक्यता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.