पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0

 

खामगाव – चिखली तालुक्यातील अंबाशीसह परिसरातील खैरव, काटोडा, गांगलगाव इत्यादी गावांमध्ये रोही, हरीण आदी वन्य प्राण्यांनी अक्षरशा: धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आला असून दिवसेंदिवस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.