
विदर्भातील विश्वासाचं प्रतीक ठरलेले रोकडे ज्वेलर्स यांनी आणखी एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. रोकडे ज्वेलर्सला ET 50 पुरस्काराने भारतातील उत्कृष्ट ५० ज्वेलरी ब्रँड्समध्ये स्थान मिळाले आहे. हा सन्मान फक्त पुरस्कार नसून गेल्या शंभराहून अधिक वर्षांच्या परंपरा, पारदर्शकता आणि गुणवता यांचा अभिमान आहे.
सन १९०० मध्ये स्थापन झालेल्या रोकडे ज्वेलर्सने नेहमीच ग्राहकांना फक्त दागिने नव्हे, तर विश्वास आणि समाधानाचा अनुभव दिला आहे. आज नागपूर व भंडारा येथे सात भव्य शाखा कार्यरत असून लवकरच गोंदिया येथे आठवी शाखा सुरु होणार आहे.
अलीकडेच, २६ सप्टेंबर रोजी, रोकडे ज्वेलर्सच्या महाल शाखेचा नवा अवतार ग्राहकांसमोर सादर करण्यात आला. तब्बल १६,००० चौ. फूटांमध्ये विस्तारलेले हे नूतनीकरण केलेले शोरूम आता अधिक मोठं, उजळ आणि भव्य आहे. सकाळी ६ वाजता सुरु होताच हजारो ग्राहकांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद लुटला व रोकडे ज्वेलर्सवरील आपला विश्वास पुन्हा अधोरेखित केला.
या निमिताने रोकडे ज्वेलर्सचे डायरेक्टर पारस रोकडे म्हणाले – ‘इकॉनॉमिक टाइम्स कडून भारतातील टॉप ५० ब्रँड्स मध्ये स्थान मिळणं आमच्यासाठी अभिमानाचा व कृतज्ञतेचा क्षण आहे. हा सन्मान आमच्या ग्राहकांचा आहे, ज्यांनी पिढ्यान् पिढ्या आमच्यावर विश्वास ठेवला आहे. महाल शाखेचं पुनः उद्घाटन म्हणजेच परंपरा आणि आधुनिकतेचं सुंदर मिश्रण आहे.”
रोकडे ज्वेलर्सचं आश्वासन कायम एकच राहिलं आहे प्रामाणिक डिझाईन्स, पारदर्शक किंमत व स्मरणीय खरेदीचा अनुभव सोने, हिरे किंवा पोल्की प्रत्येक संग्रहामध्ये रोकडे ज्वेलर्सची गुणवता आणि वेगळेपण दिसून येतं. इकॉनॉमिक टाइम्सकडून मिळालेलं हे स्थान रोकडे ज्वेलर्सच्या अग्रगण्य भूमिकेचं द्योतक आहे. यामुळे हेही स्पष्ट होतं की परंपरेशी घट्ट जोडलेला ब्रँड आधुनिक काळातही ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकतो.
Degrade
→