खासगीकरण-कंत्राटीकरण विरोधात “आगाज मोर्चा”

0

 

अमरावती- खासगीकरण-कंत्राटीकरण विरोधात “आगाज मोर्चा”काढण्यात आला.संत गाडगेबाबा मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली.कंत्राटी पदभरतीतील शासन निर्णय मागे घेण्याची मागणी.सर्व परीक्षा एमपीएससी आयोगा मार्फतच घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.अमरावती जिल्ह्यतील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा होता.संविधानाच्या प्रस्ताविका व संविधान पुस्तिका विद्यार्थीच्या हातात होते. मागण्यांचे फलक घेवून विद्यार्थी रस्त्यावर उतरले. मोर्चात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.जोपर्यंत हा जीआर रद्द होत नाही, तोवर आमचे आंदोलन सुरूच राहणार, असा विद्यार्थांनी इशारा दिला.