नितीन राऊतांच्या नाराजीमुळे काँग्रेसमधील लाथाळ्या पुन्हा उघड

0

नागपूर :(NAGPUR)महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत माजी पालकमंत्री व काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या अनुपस्थितीची (Former Guardian Minister & Congress Leader Nitin Raut) चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्यांपायी राऊत यांनी वज्रमूठ सभा टाळली की त्याला आणखी काही कारण होते, असा प्रश्न आता (CONGRESS)काँग्रेस नेत्यांच्या वर्तुळात विचारला जातोय. विशेष म्हणजे सभेपूर्वीच नितीन राऊत हे उपस्थित राहणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. सभेच्या तयारीच्या बैठकांमध्ये नितीन राऊत यांना काँग्रेसच्या इतर गटांकडून टाळण्यात आल्याने त्यांनी सभेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. विशेष म्हणजे उत्तर नागपुरात डॉ. बाबासाहेब कन्वेंशन सेंटरच्या लोकार्पण समारंभात राऊत यांनी (NITIN GADKARI)गडकरी आणि (DEVENDRA FADNAVIS)फडणवीस यांच्या समवेत हजेरी लावली होती.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात (NITIN RAUT)नितीन राऊत हे आघाडीचे मंत्री होते. नागपूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी राहिलेल्या राऊत यांनी नागपुरातील (Vajramooth Sabha)वज्रमूठ सभा का टाळली, याचीच जास्त चर्चा होत आहे. सभेला विदर्भच नव्हे तर राज्यातील राष्ट्रवादी, कॉंग्रेस व सेना (UDDHAV THACKERAY)उद्धव ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. परंतु नितीन राऊत यांनी नागपुरातच झालेल्या या सभेला पाठ दाखवली. त्याचीच सर्वाधिक चर्चा दिसून आली. त्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रसार माध्यमांनाही राऊत यांनी अंदाज लागू दिला नाही. ते भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते सभेच्या आयोजनाच्या बैठकांमध्ये त्यांना निमंत्रित केले गेले नाही. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली. त्यांनी स्वतःहून एकाही बैठकीला हजेरी लावली नाही. काँग्रेस पक्षातील गटबाजी यास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते.

 

चिकन भुना मसाला आणि हॉट हनी चिकन टॅकोस|Chicken Bhuna Masala Recipe|Honey Chicken Tacos Recipe|Ep-112

https://youtu.be/jQzbHOKHXNM