जिल्हाधिकारी श्री.विनयजी गौडा साहेब यानी प्रभू श्रीराम मंदिर व शारदा मातेचे घेतले दर्शन

0

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर शहरापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मौजा विचोडा (बु) येथील चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तबगार जिल्हाधिकारी मा.श्री.विनयजी गौडा साहेब यांनी श्री.अनिल डोंगरे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या निमंत्रनाला मान देत मागील काही महिन्यापूर्वी प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती व भोलेनाथ महादेव याच्या शिवलिंग स्थापना झालेल्या मूर्तीचे दर्शन घेऊन तसेच देवी शारदा मातेला हार टाकून आरती व दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार श्री.विजयजी पवार श्री.अनिल डोंगरे शारदा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रेखा महाले माजी सरपंच सौ.किरण डोंगरे सौ. प्रियंका जाधव श्री.घनश्याम डोंगरे श्री.वसंता महाले श्री.प्रवीण कुलमेथे श्री.पांडूरंग कुलमेथे श्री.शंकर भंडारे श्री.मनोहर जाधव श्री. गोरख कुलमेथे श्री.राजू डोंगरे इत्यादी बहुसंख्येने गावातील पुरुष,महिला वर्ग उपस्थित होते.