विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक

0

(MLA Nitin Deshmukh)आमदार नितीन देशमुख यांची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक

(Amravti)अमरावती- आमदार नितीन देशमुख हे अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहचले. यावेळी पोलिसांनी त्यांचा ताफा आयुक्त कार्यालयाबाहेर अडवल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू झाली. आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्यासोबत मोजकेच कार्यकर्ते यांना आयुक्त कार्यालयात प्रवेश दिला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्याबाहेर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाल्याने कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.