Devendra Fadnavis : मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार

0
Devendra Fadnavis : मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार
devendra-fadnavis-cancer-patients-from-mauritius-are-now-being-treated-in-nagpur

मॉरिशस आणि एनसीआय-नागपूर यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

नागपूर (Nagpur) :- नागपूर मधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मॉरिशसमधील कॅन्सर उपचारात आता नागपूरचा फार मोठा सहभाग राहणार आहे.या करारानुसार, मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट (National Cancer Institute) आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा मिळू शकेल. त्याचप्रमाणे मॉरिशसमधील रुग्णालयांमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी, नर्सेस इत्यादींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटवर राहील. या सामंजस्य कराराच्या वेळी मॉरिशसचे कौन्सिल जनरल अरविंद बख्तावार, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे सीईओ शैलेश जोगळेकर आणि वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक उपस्थित होते.

मॉरिशस येथील महाराष्ट्र भवनासाठी राज्य सरकारतर्फे जाहीर 8 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्याच्या सोहोळ्यासाठी मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू हे नागपूर येथील अधिवेशनादरम्यान, नागपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला भेट दिली आणि तेथील अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पाहून ते भारावून गेले होते. त्याचवेळी असा सामंजस्य करार करण्याचे सूचोवाच त्यांनी केले होते आणि त्यातूनच आजचा दिवस साकारला. या सामंजस्य करारानंतर बोलताना मॉरिशसचे मंत्री अ‍ॅलन गानू म्हणाले की, या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसचे संबंध आणखी सुदृढ होतील. आमच्या देशात 18 वर्षांपर्यंतच्या कर्करोग रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. अलिकडेच ती वयोमर्यादा वाढवून 25 करण्यात आली आहे. या करारामुळे मॉरिशसमधील रुग्णांना सुद्धा आता चांगल्या आरोग्यसुविधा प्राप्त होणार आहेत. हा करार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत होतो आहे, याचा मला विशेष आनंद आहे.

Nagpur News
Nagpur is famous for
NMC Nagpur property tax receipt
Nagpur area
Index number for property tax Nagpur
Nagpur which state
Property tax NMC Nagpur
Nagpur in which state in Map