दिल्ली पोलिसांकडून कुस्तीपटूंना ‘त्या’ पुराव्यांची मागणी

0

नवी दिल्ली- कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आरोपांचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंकडून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील फोटो, ऑडिओ पुरावे मागितले आहेत. (Delhi Police Investigation on allegation on Brijbhushan Sharan Singh) त्यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी चार महिने न्यायासाठी कुस्तीपटूंनी जंतर-मंतरवर आंदोलन केले. अलिकडेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत १५ जूनपर्यंत आंदोलनाला स्थगिती दिली आहे. 7 जून रोजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी 15 जूनपर्यंत त्यांचा विरोध थांबवण्याचे मान्य केले होते. 15 जून रोजी दिल्ली पोलीस या प्रकरणी आरोपपत्र दाखल करणार आहेत, अशी माहिती आहे.
साक्षी मलिकसह बजरंग पुनियाने सरकारला अल्टीमेट दिला. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात आता पुरावे म्हणून फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ देण्यास सांगितले आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, लैंगिक छळाच्या या घटना 2016 ते 2019 दरम्यान दिल्लीतील फेडरेशनचे कार्यालय तसेच परदेशातील स्पर्धांच्या दरम्यान घडल्याचा आरोप आहे. यासंदर्भात एका कुस्तीपटूने सांगितले की, “आम्ही आमच्याकडे जे काही पुरावे आहेत, ते दिले आहेत. आमच्या एका नातेवाईकानेही पोलिसांना जे पुरावे मागितले, ते दिले आहेत.”
कुस्तीपटू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलचा तपशीलही पोलिसांनी मागवला आहे.